प्रणव मुखर्जी यांच्याबाबत खोट्या बातमीचे ट्विट; राजदीप सरदेसाईंनी मागितली माफी

Pranab Mukherjee - Rajdeep Sardesai

दिल्ली : एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे पत्रकार राजदीप सरदेसाई (Rajdeep Sardesai) यांनी आज (१३ ऑगस्टला ) माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या निधनाबाबत चूक बातमी ट्विट केली. यासाठी ट्रोल झाल्यानंतर त्यांना माफी मागावी लागली.

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर दिल्ली येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्रकार राजदीप सरदेसाई यांना कुठून तरी मुखर्जी यांच्या निधनाची बातमी कळली आणि त्यांनी लगेच ट्विट करून प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यानंतर, प्रणव मुखर्जी यांच्याबद्दल खोटी बातमी व्हायरल केल्याबद्दल नेटीजन्सने सरदेसाई यांना ट्रोल करणे सुरू केले. चूक लक्षात आल्यानंतर सरदेसाई यांनी दुसरे ट्विट करून क्षमा मागितली.

ट्विटमध्ये ते म्हणातात – प्रणव  मुखर्जी यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल केल्याबद्दल मी , मनापासून क्षमा मागतो. या बातमीची सत्यता न तपासता मी ट्विट केले हे माझ्या व्यवसायाच्या नैतिकतेच्या विरुद्ध आहे. मी मुखर्जी परिवाराची क्षमा मागतो.

प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित आणि कन्या शर्मिष्ठा यांनी राजदीप यांचे नाव न घेता त्यांच्या ट्विटबद्दल नाराजी व्यक्त केली.

अभिजित यांनी ट्विट केले – माझे वडील प्रणव मुखर्जी अजून ह्यात आहेत. एका प्रतिष्ठित पत्रकाराने सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची खोटी बातमी टाकली. भारतातील माध्यमे खोट्या बातमीची फॅक्ट्री आहेत, हे याचे उदाहरण आहे. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट केले – माझ्या वडिलांच्या निधनाचे वृत्त खोटे आहे. प्रसिद्धी माध्यमांना विनंती, कृपया मला फोन करू नका. रुग्णालयातून माहितीचा फोन मिळावा म्हणून माझा फोन मोकळा ठेवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER