लोकसभा माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाची खोटी बातमी; सुप्रिया सुळेंनीही केले होते ट्विट

Maharashtar Today

मुंबई :- लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल झाली आहे (False-news-of-sumitra-mahajans-death).

विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी सोशल मीडियावर (Social Media) ट्वीट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे ही अफवा अधिक पसरली आहे. मात्र ही बातमी खोटी असल्याची माहिती स्वतः महाजन यांनी दिली आहे .

खातरजमा करण्याअगोदर माझ्या निधनाची बातमी देण्याची कसली घाई होती असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याचे ट्विट करत श्रद्धांजली वाहिली होती. जेव्हा शशी थरूर यांना समजलं की ही अफवा आहे तेव्हा ट्विटरवर आधीचं ट्विट डिलिट केलं. त्यांनी म्हटले की, अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात हे धक्कादायक आहे. सुमित्रा महाजन यांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना. थरुर यांना यामुळे ट्रोलही केलं जात आहे. दुसरीकडे सुमित्रा महाजन यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, न्यूज चॅनेल्सनी कशी काय याबाबत बातमी चालवली? त्यांनी किमान एकदा इंदौर प्रशासनाला तरी विचारायचे होते , असे त्या म्हणल्या .

दरम्यान सुमित्रा महाजन काही दिवसांपूर्वी त्यांना ताप होता, त्यामुळे त्यांना इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याशिवाय गुरुवारी त्यांचा कोविड रिपोर्ट निगेटिव्हही आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button