शेअर बाजारात घसरण

corona-Sensex stock market-Starting to fall

मुंबई : आंतरराष्ट्रीय लवादाने रिलायन्स- फ्युचर समूहादरम्याच्या व्यवहाराला स्थगिती दिल्यानंतर रिलायन्स कंपनीचा शेअर आज चार टक्‍क्‍यानी कोसळला. त्यामुळे शेअर बाजारात विक्रीचे वातावरण होते. बाजार घसरला.

सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स सकाळी ७३७ अंकांनी कोसळला होता. बाजार बंद होताना सेन्सेक्‍स शुक्रवारच्या तुलनेत ५४० अंकांनी म्हणजे १. ३३ टक्‍क्‍यांनी कमी होऊन ४०,१४५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १६२ ने घसरून ११,७६७ अंकांवर बंद झाला.

बजाज ऑटाचा शेअर सर्वात जास्त म्हणजे सहा टक्‍क्‍यानी कोसळला. गेल्या आठवड्यात कंपनीने जाहीर केलेल्या ताळेबंदात कंपनीचा नफा बराच कमी झाला आहे. महिंद्रा, टाटा स्टील, स्टेट बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंकेलाही विक्रीच्या दबावाचा फटका बसला. जागतिक बाजारातही वातावरण नकारात्मक असल्यामुळे निर्देशांकाना आधार मिळाला नाही, असे आनंद राठी संस्थेचे संशोधन प्रमुख नरेंद्र सोळंकी म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER