सोन्याच्या दरात घसरण

Gold Rates

मुंबई : सोन्याच्या (Gold) दरात पुन्हा एकदा घसरण झाली असून, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतिग्रॅम 51 हजार रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 200 रुपये झाला आहे. गेल्या आठवड्यात हाच दर जीएसटी सह 55 हजार रुपयांवर होता.

जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेचा सोन्या-चांदीच्या भावावर परिणाम झाला आहे. आर्थिक अनिश्चिततेच्या वेळी सोन्याला एक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते; पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अनेक आर्थिक घडामोडींचा सोने दरावर परिणाम होतो.

गेल्या सहा दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. बुधवारी दि. 2 सप्टेंबर रोजी देशभरातील सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 551 रुपयांनी घसरून 51,024 रुपयांवर आला आहे. नंतर पुन्हा या दरात वाढ होऊन सोन्याचा भाव 329 रुपयांनी वाढून 51,575 रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर चांदीचा दर 2046 रुपयांनी घसरून 66,356 रुपयांवर आला. अमेरिकी डॉलर इंडेक्समध्ये घसरण आणि दहा वर्षांच्या अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात घट झाल्याचे दिसून आले.

गेल्या महिन्यात 26 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 400 रुपये होता. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 50 हजार 500 रुपये गेला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER