
नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात केंद्र सरकारने कपात केल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. तर चांदीचे भाव वधारले. दिल्लीमध्ये सोन्याचे प्रती तोळ्याचे दर 1324 रुपयांची घसरुन 47 हजार 520 रुपयांवर आले. चांदीचे प्रती किलोचे दर 3461 रुपयांनी वाढून 72 हजार 470 रुपयांवर गेले आहेत.
जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर 1870 डॉलर्स प्रती औंसच्या आसपास स्थिर आहेत तर चांदीचे दर 30 डॉलर्सवर गेले आहेत. सोन्या-चांदीच्या आयातीवरील करात सोमवारी केंद्र सरकारकडून कपात करण्यात आली. जुलै 2019 मध्ये सोन्या-चांदीवरील आयात करात 12.5 टक्क्याने वाढ करण्यात आली होती. त्यानंतर या दोन्ही धातूंचे दर झपाट्याने वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आयात कर कमी केला जाणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतेवेळी सांगितले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला