सूर्याभोवती पडलं खळं : शास्त्रीय कारण काय

Sun

कोल्हापूर : राज्यातील अनेक आज, सोमवारी भागात सुर्याभोवती गोल इंद्रधनुष्य रंगाचे खळे पडल्याचा नजारा दिसला. सूर्याभोवती पडणारे खळं हे physics मधील ऑप्टीकस चा भाग आहे.सूर्या भोवतालचा खळं किवां रिंगण हा प्रिसम मधून किरणे गेल्यानंतर जसे सप्त रंग दिसतात तसाच हा प्रकार आहे .या सूर्याभोवतीलच्या खळ्यास इंग्रजी मध्ये हॅलो (halo)असे म्हणतात.तसेच मराठीमध्ये इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ असे म्हणतात. वादळ आल्यनंतर आकाशामध्ये जवळ जवळ 20 हजार फूट उंचीवरती सिरस नावाचे ढग तयार होतात .

या ढगांच्या मध्ये लाखों च्या संख्यने लहान लहान बर्फाचे क्रिस्टल्स असतात.या क्रिस्टल्स मधून सूर्याची किरणे गेल्यानंतर त्या किरणांचे रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅकशन किंवा स्प्लिंटिंग होते.या मध्ये बर्फाचे असनारे तुकडे हे प्रिझम सारखे काम करतात.पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा १. ३३ आहे.पाणी हे द्रव स्वरूपात असते तर बर्फ हा घन पदार्थ असतो.त्यामुळे हवेतून सूर्याची किरणे जेंव्हा घन पदार्थ मधून जातात तेव्हा माध्यम बदलते व किरणांचे वक्रीकरण होते.यातूनच सूर्याभोवतीलचे खळं पाहावयास मिळते.या गोलाची त्रिज्या 22 अंश डिग्री इतकी असते .

यामध्ये या गोलाच्या आतील बाजूस लाल रंग दिसतो तर बाहेरच्या बाजूस निळा रंग दिसतो.हे खळे फक्त सूर्या भोवतीच दिसते असे नाही तर चंद्राभोवती देखील असे खळे दिसते. यामध्ये कुठीलीही अंधश्रद्धा बाळगू नये, अशी माहिती प्रा . डॉ . मिलिंद मनोहर कारंजकर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER