शिवसेनेबरोबर युती केल्यापासून काँग्रेसच्या पतनाला सुरुवात – संजय निरुपम

Sanjay Nirupam

मुंबई : काँग्रेसनं महाविकास आघाडीबरोबर जात शिवसेनेबरोबर (Shivsena)युती केली, तेव्हापासून काँग्रेसच्या पतनाला सुरूवात झाली, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केली. ते मुंबईतल्या काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून सर्व काही शांत होते, म्हणूनच मी काही तरी बोलायचो, परंतु भाई जगताप यांनी आता सुरुवात केली आहे. मी भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यासोबत आहे. दिवसरात्र मेहनत करेन आणि पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाची बाजू भक्कम करेन, जर पक्ष जिवंत असेल तर आपण सर्व आहोत, असंही संजय निरुपमांनी (Sanjay Nirupam) म्हटलं.

देशात आणि महाराष्ट्रात बर्‍याच घडामोडी घडत आहेत, हे थांबवणारे कोणीच नाही, जे सत्तेत आहेत, त्यांना शांतपणे बसावे लागतं. लस आली आहे, जर खरंच ही लस चांगली असती तर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली असती. त्याचे दुष्परिणाम त्यांना समजले असते. अमेरिकेतील अनेक लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रसित झालेत. त्यामुळे त्यांना लस देण्यात आलेली नाही. शेतकरी आंदोलनाविरोधात चर्चा सुरू आहेत, पण राहुल गांधी हे शेतकर्‍यांच्या पाठीशी आहेत, दिल्ली सरकार कोणाचे ऐकत नाही, असंही संजय निरुपम म्हणालेत.

2014 च्या निवडणुका सुरू होण्याआधीच अर्णव गोस्वामी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. जागतिक घोटाळा शोधणाराच आता स्वतः घोटाळ्यांमध्ये अडकला आहे. अर्णवच्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. मुंबईत काँग्रेस पक्षाच्या ताकदीवर आम्ही निवडणुका लढणार आहोत. मुंबईत दोन, तर महाराष्ट्रात काँग्रेसचे 12 मंत्री आहेत. सरकारच्या ताकदीचा वापर करा आणि निवडणूक लढा, असं आवाहनही संजय निरुपम यांनी केलं. सरकारला किती वेळा निर्णय बदलावे लागतात हे कोरोना काळात आम्ही बघितले. सरकारमध्ये असताना अस्लम शेख यांना निषेध करावा लागतो, सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे कौतुक करण्याची गरज नाही, असंही संजय निरुपम म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ‘औरंगजेब कुणाला प्रिय?’ मुस्लिम व्होट बँक गमावू या भीतीने काँग्रेसचा नामांतराला विरोध – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER