आता फखर झमानच्या नावावर आहे दोन देशातील सर्वोच्च वन डे खेळी

Fakhar Zaman - Maharastra Today

दक्षिण आफ्रिकेविरुध्द जोहान्सबर्गच्या वन डे सामन्यात फखर झमानने पाठलागात केलेल्या 193 धावांच्या खेळीची चर्चा आहे. ज्या पध्दतीने तो धावबाद झाला त्यावरुन ही चर्चा आहे पण त्याशिवाय या खेळीत त्याने बरेच विक्रम केले. पराभवात ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खेळी ठरली तर पाठलागात सर्वात मोठी खेळी ठरली. याशिवाय पाकिस्तानच्या डावातील तब्बल 64.5 टक्के धावा त्याने एकट्याने केल्या.

या विक्रमांसह आणखी एक विक्रम त्याच्या नावावर लागला आहे. तो म्हणजे वन डे इंटरनॅशनलमधील दक्षिण आफ्रिकेतील ही सर्वोच्च खेळी होती.याआधीचा विक्रम फाफ डू प्लेसीसच्या 185 धावांचा होता ज्या त्याने केपटाऊन येथे 2017 साली श्रीलंंकेविरुध्द केल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेशिवाय झिम्बाब्वेतील सर्वोच्च वन डे खेळीसुध्दा (210) झमानच्या नावावर आहे. या प्रकारे दोन वेगवेगळ्या देशातील सर्वोच्च वन डे खेळी नोंदवणाऱ्या मार्टीन गुप्तील, सनथ जयसूर्या व ख्रिस गेल या मोजक्याच फलंदाजांच्या पंक्तीत तो जाऊन बसलाय.

यात योगायोगाचा भाग म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च खेळी आता पाकिस्तानी फलंदाजाच्या नावावर (फखर झमान) तर पाकिस्तानातील सर्वोच्च वन डे खेळी दक्षिण आफ्रिकन फलंदाजाच्या (गॕरी कर्स्टन) नावावर आहे.

प्रत्येक देशातील सर्वोच्च वन डे खेळी

  • भारत- रोहित शर्मा – 264 वि. श्रीलंका- कोलकाता- 2014
  • न्यूझीलंड- मार्टीन गुप्तील – 237 वि. वेस्ट इंडिज- वेलिंग्टन- 2015
  • आॕस्ट्रेलिया- ख्रिस गेल – 215 वि. झिम्बाब्वे- कॕनबेरा- 2015
  • झिम्बाब्वे- फखर झमान – 210 वि. झिम्बाब्वे- बुलावायो- 2018
  • दक्षिण आफ्रिका- फखर झमान – 193 वि. दक्षिण आफ्रिका- जोहान्सबर्ग- 2021
  • इंग्लंड- विव्ह रिचर्डस – 189 वि. इंग्लंड- मँचेस्टर- 1984
  • इंग्लंड- मार्टिन गुप्तील – 189 वि. इंग्लंड- साउथम्प्टन- 2013
  • युएई- सनथ जयसूर्या – 189 वि. भारत- शारजा- 2000
  • पाकिस्तान- गॕरी कर्स्टन – 188 वि. युएई- रावळपिंडी- 1996
  • बांगलादेश- शेन वाॕटसन – 185 वि. बांगलादेश- ढाका- 2011
  • आयर्लंड- जाॕन कॕम्पबेल – 179 वि. आयर्लंड- डब्लीन- 2019
  • कॕनडा- पाॕल स्टर्लिंग – 177 वि. कॕनडा- टोरांटो- 2010
  • वेस्ट इंडिज- उपूल थरांगा – 174 वि. भारत- किंग्स्टन- 2013
  • श्रीलंका- कुमार संघकारा – 169 वि. द. आफ्रिका- कोलंबो- 2013
  • नेदरलँड- सनथ जयसुर्या – 157 वि. नेदरलँड- अॕमस्टेलव्हीन- 2006
  • पापुआ न्यू गिनी- ख्रिस मॕक्लिओड- 154 वि. पापुआ न्यू गिनी- पोर्ट मोरेस्बी- 2017
  • केनिया- ख्रिस गेल- 152 वि. केनिया- नैरोबी- 2001
  • स्कॉटलंड- शाॕन मार्श- 151 वि. स्काॕटलंड- एडिनबर्ग- 2013

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button