बनावट ट्विटर अकाउंट खोडसाळपणा ; एकनाथ खडसे संतापले

Eknath Khadse

जळगाव : राजकीय नेत्यांना समर्थकांशी, जनतेशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम माध्यम ठरत आहे. कधी कधी हे माध्यम नेत्यासाठी डोकेदुखीही ठरत आहे. भाजपमधून (BJP) राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या बाबतही असाच प्रकार घडला आहे.

एकनाथ खडसे यांच्या नावाने एक ट्विटर अकाऊंट तयार करण्यात आलं होतं. याबाबत खडसे यांनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरून माहिती देत कारवाईचा इशारा दिला तसेच,@EknathGKhadse हे अधिकृत अकाउंट असल्याचे सांगितले आहे.

खोडसाळपणा या ठळक मथळ्याखाली, ‘कुणीतरी खोडसाळपणे माझ्या नावाने @KhadseSpeaks हे ट्विटर अकाऊंट सुरु केले आहे, जे अनधिकृत आहे. याच्या संदर्भात रीतसर ट्विटरकडे तक्रार दाखल केली आहे. माझे अधिकृत अकाऊंट @EknathGKhadse हे असून त्याला 2 लाखांच्या वर फॉलोअर्स आहेत. कृपया याची नोंद घ्यावी.’ अशी माहिती खडसे यांनी अधिकृत ट्विटरवरून दिली आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांचे जुने सहकारी देखील भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER