बनावट टीआरपी : ‘रिपब्लिक’च्या अर्णब गोस्वामींना अटक करा- प्रताप सरनाईक

Sarpratap Nail-Arnab Goswami

मुंबई :  पैसे वाटून बनावट टीआरपी (Fake TRP) वाढवण्याऱ्या ‘रिपब्लिक’ चॅनेलच्या (Republic) अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक करा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन रॅकेटची माहिती दिली.

‘सत्यमेव जयते!’, ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स टीव्ही’च्या चालकांप्रमाणेच लोकांना पैसे देऊन बनावट टीआरपी वाढवणाऱ्या ‘रिपब्लिक’ चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांना लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी मी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे करतो.- असे ट्विट प्रताप सरनाईक यांनी केले. याआधी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘असत्यमेव जयते’ म्हणत रिपब्लिक वाहिनीला टोमणा मारला होता.

टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणारी टोळी मुंबई पोलिसांनी शोधली आहे. बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होते. यातून ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आणि ‘रिपब्लिक टीव्ही’ या वाहिन्यांना अवैधरीत्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली. ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा’च्या चालकांना अटक करण्यात आली आहे. रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठीही रॅकेट चालवणाऱ्यांकडून मदत घेण्यात आल्याची माहिती आहे, असे परमबीर सिंह म्हणाले. आता रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तकांची चौकशी करण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER