नागपूर कचरामुक्त सिटीच्या रेटिंगमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी

Tukaram Munde-Garbage Situation

नागपूर :- देशामध्ये बायो फ्री सिटी संकल्पना प्रथम नागपुरात आणणारे शहर आता कचरामुक्त सिटी रेटिंग मिळविण्यात अपयशी ठरले आहे. ४३७२ शहरानंतर १४३५ जिपीसी रेटिंग्सची गणना करण्यात आली. ज्यात महाराष्ट्रातील ७० शहरांना वेगळी जीपीसी रेटिंग मिळाली आहे.

नागपूर विभागातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर, मौदा आणि नरखेडला तीन स्टार रेटिंग मिळाले आहे .

केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुर यांनी देशातील स्वच्छता व कचरामुक्त शहरांच्या फाईव्ह स्टार रेटिंगची घोषणा केली. त्यामध्ये, राज्यातील एकमेव शहराचा समावेश करण्यात आला, नवी मुंबईला हा बहुमान मिळाला आहे. देशात सन २०१८ पासून फाईव्ह स्टार रेटिंग शहरांची घोषणा करण्यात येत आहे. अंबिकापूर, राजकोट, सुरत, म्हैसूर, इंदौर आणि नवी मुंबई या शहरांनी स्थान मिळवले आहे. तर देशातील ६५ शहरांना थ्री स्टार शहराने गौरविण्यात आले आहे. तर, ७० शहरांना १ स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. याबद्दल हरदीपसिंग पुरी यांनी सर्वच शहरांचे अभिनंदन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला