फडणवीसांचा नाथाभाऊंना शब्द, ‘पुढच्या वेळी नक्कीच जेवण करुन जाणार’

Maharashtra Today

जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fanavis) यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांच्या मुक्ताईनगर येथील घरी भेट दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपल्या अनुपस्थितीत निवासस्थानी आलेल्या फडणवीसांना ‘जेवल्याशिवाय जाऊ नका’ अशी साद नाथाभाऊंनी घालत आदरातिथ्य दर्शवले. मात्र, फडणवीसांनीही त्यांच्या शब्दाचा मान राखून ‘आता नाही, पुढच्या वेळी नक्की जेवण करुन जाईल, असे नम्रपणे सांगत खडसेंना प्रतिसादही दिला.

नुकताच आलेल्या वादळामुळे नुकसान झालेल्या मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील भागाची पाहणी करण्यासाठी फडणवीस मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जामनेरहून ते थेट मुक्ताईनगरला दाखल झाले. खासदार रक्षा खडसे यांच्या आग्रहाखातर फडणवीस कोथळीत खडसे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी गेले होते. माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे आदी त्यांच्यासोबत होते. फडणवीस त्याठिकाणी जवळपास अर्धातास होते. तेथेच त्यांनी चहापान केले.

देवेंद्र फडणवीस खडसे यांच्या निवासस्थानी कोथळीत पोचले तेव्हा खडसे मुंबईत होते. रक्षा खडसे यांनी त्यांचे स्वागत केले. चहापान सुरु असताना भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी भ्रमणध्वनी करत खडसे व फडणवीसांमध्ये संभाषण घडवून आणले. फोनवरून नमस्कार चमत्कार झाल्यानंतर खडसे म्हणाले, ‘मी, इकडे मुंबईत आहे. आपण आलात, आपले स्वागत आहे. मी नसलो तरी जेवल्याशिवाय जाऊ नका’ या आग्रही विनंतीला फडणवीसांनी ‘आपल्या भागात आलो आहे. जेवणाचे नियोजन अन्य ठिकाणी आधीच झालेले आहे. पुढच्या वेळी आपल्याकडे नक्की जेवण करेल,’ असे नम्रपणे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button