फडणवीसांच्या ‘त्या’ आवेशपूर्ण भाषणावरून काँग्रेसचा खोचक टोला; व्हिडीओ केला ट्विट

Devendra Fadnavis - Maharastra Today

मुंबई : नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी २४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारणाला सुरुवात झाली आहे. नाशिक महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निवडणुकीच्या वेळी नाशिकमध्ये केलेल्या एका आवेशपूर्ण भाषणाचा व्हिडीओ ट्विट (Video Tweet) केला आहे.

या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी “मी नाशिकला दत्तक घेतो आणि या शहराचा चेहरामोहरा बदलेन. ” अशी गर्जना केली होती. याच मुद्द्यावरून काँग्रेसने आता भाजपवर टोलेबाजी करायला सुरुवात केली आहे. ‘एकदा पालकत्व घेतल्यानंतर ते असे मध्येच सोडायचे नसते… देवेंद्र फडणवीस साहेब’ असे कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे. त्यामुळे आता भाजपकडून या टीकेला कशा प्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button