दोन कोटी लसी जमिनीतून उगवल्या? फडणवीसांचा ठाकरे सरकारला झोंबणारा सवाल

मुंबई :- राज्याने दोन कोटी लसीकरणाचा (Corona Vaccine) टप्पा पूर्ण केल्याचे काल जाहीर केले. या लसी कुठून आल्या, जमिनीतून उगवल्या का? असा झोंबणारा सवाल करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारवर (Thackeray Govt) टीका केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना लसींच्या बाबत फडणवीस म्हणालेत की, “महाराष्ट्रापेक्षा दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेशला दीड कोटी लसी आतापर्यंत मिळाल्या आहेत. तर महाराष्ट्राला दोन कोटी. या लसी कुठून आल्या? जमिनीतून उगवल्या का? केंद्रानेच दिल्या ना. तरीही सरकार कांगावा करत आहे. काही नेत्यांची स्क्रिप्ट ठरलेली असते. केंद्राने दिले नाही, केंद्राने करायला पाहिजे. याच गोष्टी हे नेते रोज सकाळी उठून जे घडेल त्याबद्दल बोलत असतात.”

ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या तक्रारींबद्दल ते म्हणालेत की, “महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. यावरून दिल्लीच्या कोर्टात सुनावणीही सुरू आहे की, महाराष्ट्राला सर्वांत जास्त ऑक्सिजन का? तरीही सरकार केंद्राच्या नावाने कांगावा करत आहे. सरकारला वाटते आहे की, त्यामुळे गोंधळ निर्माण होईल. पण हा गोंधळ तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. तो ओसरल्यावर नागरिकांना खरे कळतेच.”

सरकार फक्त मुंबईचे !
एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीस यांनी आरोप केला की, राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. हे फक्त मुंबईचे सरकार आहे. या सरकारला मुंबईच्या बाहेरचा महाराष्ट्र दिसत नाही. नागपूरमध्ये (Nagpur) तर सरकारचे एकही कोविड सेंटर नाही, जे आहेत ते महापालिकेचे! कोरोनाकाळात सरकारने मुंबईच्या बाहेर बघितलेच नाही.

ही बातमी पण वाचा : … माझा शब्द खरा करून दाखवणार, पण आता लढायचे आहे कोरोनाशी – फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button