औरंगाबादचे नामकरण करताना तुमची अस्मिता कोठे होती? फडणवीसांचा शिवसेनेला प्रश्न

Devendra Fadnavis-Shivsena

मुंबई : बेळगाव सीमाप्रश्नाच्या बाबतीत आम्ही सरकारसोबत आहोत. हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही स्वतः केंद्राशी चर्चा करू. मात्र औरंगाबादचं नामकरण (Aurangabad name changing) करताना त्यांची ही अस्मिता कोठे गेली होती? असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीवरून फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर शरसंधान साधलं.

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीला मुख्यमंत्री अभिवादन करत नाही. त्यांच्याकडून साधं एक ट्विट केलं जात नाही. ही किती मोठी लाचारी आहे. काँग्रेसनं सावरकरांवर कायम अन्याय केला. पण शिवसेनेनं सत्तेसाठी सावरकरांवर जो अन्याय केला, त्याचं मला जास्त आश्चर्य वाटतं. माझा शिवसेनेला एक फुकटाचा सल्ला आहे. सरकार येतं जातं. पण सत्तेसाठी कोण किती लाचारी पत्करली, याची नोंद इतिहास ठेवत असतो. काँग्रेससोबत राहून शिवसेनेनं सत्तेसाठी लाचारी पत्करू नये.’ अशा शब्दांत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER