एखाद्याला बदनाम करण्याची फडणवीस यांची जुनीच पद्धत ; एकनाथ खडसे यांचे भाजपवर टीकास्त्र

Eknath Khadse - Devendra Fadnavis

मुंबई :- राज्यात सत्ता गेल्याने भाजप अस्वस्थ झाली आहे . भाजपमधून कुणी दुसरीकडे जाऊ नये, यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) सातत्याने आमचे सरकार येणार असल्याचे सांगत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पत्रकार परिषदेत लगावला

माझ्यावरही गंभीर आरोप झाले. माझ्याबाबतीत जसे राजकीय षडयंत्र रचले गेले, तसेच आता गृहमंत्र्यांबाबत रचले जात आहे. एखाद्याला बदनाम करण्याची फडणवीस यांची जुनीच पद्धत असल्याचेही ते म्हणाले.

एकनाथ खडसे म्हणाले, काही आरोप राजकीय दबावापोटी केले जातात.

परमवीर सिंग (Parambir Singh) यांनी बदली होण्याआधी आरोप केले असते, तर त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले असते. बदलीनंतर एखाद्याने केलेले आरोप आकसापोटी केलेले असतात. परमवीर सिंग यांच्याबाबतही अनेक तक्रारी पुढे येत आहेत. पोलिसांच्या बदल्या करण्याचा अधिकार गृहमंत्र्यांना नाही, तर आस्थापना मंडळाकडून या बदल्या केल्या जातात.

देवेंद्र फडणवीस सतत दिल्लीला जात आहेत, राज्यपालांना भेटत आहेत, याबाबत विचारले असता खडसे म्हणाले, वरून जर एखाद्याचा कार्यक्रम करायचे ठरले असेल, तर त्याची पद्धत देवेंद्र फडणवीस ठरवतात. मी महसूलमंत्री असताना माझ्यावर आक्षेप घेतले गेले. आत्ताही तीच पद्धत सुरू आहे.

ही बातमी पण वाचा : राणेंकडून शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम, शिवसेनेला धक्का देत जि. परिषदेत भाजपचा अध्यक्ष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER