
अहमदनगर :- ज्येष्ठ समाजेसवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून घोषित उपोषण मागे घेतले आहे. अण्णा हजारे यांनी गुरुवारी प्रसिद्धिपत्रक काढून उपोषणाचा निर्णय जाहीर केला होता. अण्णा हजारे यांच्या या निर्णयानंतर शुक्रवारी भाजपाचे नेते राळेगणसिद्धीत ठाण मांडून होते. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी राळेगणसिद्धीत येऊन अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी आपला उपोषणाचा निर्णय मागे घेतला. (Anna Hazare will takes back hunger strike decision for farmers demands)
यानंतर अण्णा हजारे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि कृषी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या निर्णयांना उशीर झाल्याचे मान्य केले. त्यावर केंद्र सरकारने उच्चाधिकार समिती स्थापन करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे मी नियोजित उपोषण मागे घेतो, असे अण्णा हजारे यांनी जाहीर केले.
उच्चस्तरीय समिती स्थापन करायला उशीर, चूक मान्य : फडणवीस
फडणवीस म्हणालेत, आम्ही अण्णा हजारे यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याच्या निर्णयाला उशीर झाला हे आम्ही मान्य करतो. अण्णांच्या मागण्या ऐकून मी आणि गिरीश महाजन दिल्लीला गेलो होतो. आम्ही केंद्र सरकारसमोर अण्णांच्या मागण्या ठेवल्या. यावर सखोल चर्चा झाल्यानंतर उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांची घोषणा ; अयोध्येला जाणार!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला