तर फडणवीस यांनी दोन दिवसात प्रश्न सोडविला असता : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्य सरकारने आमच्याकडे मदत मागितली असती तर देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना संदर्भातील प्रश्न दोन दिवसांत सोडवले असते, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आज केला.

ही बातमी पण वाचा:- पंकजा मुंडेंना केंद्रात महत्वाची जबाबदारी मिळणार – चंद्रकांत पाटील

आ. पाटील म्हणाले, राज्य सरकारच्या कारभाराबाबत चौथीची पोरगी पण सांगेल की यांचे काही खरे नाही. कोरोना संकटात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला ‘इगो’ आडवा येतो. सरकारला लॉक की अनलॉक अजून कळत नाहीत. आपसातले मतभेद आणि गोंधळ संपत नाहीत. खा. शरद पवार यांची चीनबद्दलची भूमिका ही मोदींच्या समर्थनार्थ होती. ती काँग्रेसला कशी पटेल? त्यांच्यामधील वादाचा फटका हा शिवसेनेला बसत आहे; पण सत्तेपायी सेनेला तो चालतो, असा टोलाही पाटील यांनी हाणला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER