फडणवीसांनी पुन्हा मन जिंकलं, १०० अनाथ मुलांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली

Devendra Fadnavis - Maharashtra Today

मुंबई :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकाराने नागपूरमधील श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टकडून ‘सोबत’ हा स्त्युत्य उपक्रम सुरू करण्यात आला. कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याचे काम या ट्रस्टद्वारे करण्यात येत आहे. या संस्थेच्या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बोलविण्यात आलं होतं. यावेळी, बोलताना देवेंद्र फडणवीसांनी पहिल्याच दिवशी नोंदणी झालेल्या १०० अनाथ मुलांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. फडणवीसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांनी लाखोंचं मन जिंकलं आहे.

नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी हे श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे प्रमुख असून सामाजिक कार्यासाठी ही संस्था काम करते. सध्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटात अनेकांनी आपल्या आप्तेष्ठांना गमावलंय. आपले आई-वडिल गमावल्याने कित्येक मुलं अनाथ झाले आहे. या अनाथ मुलांसांठी ट्रस्टच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला. सोबत या उपक्रमाच्या माध्यमातून अनाथांना मायेची ऊब देण्याचं काम या संस्थेद्वारे होत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी संस्थेत नोंदणी झालेल्या मुलांची संपूर्ण जबाबदारी घेती आहे. संस्थेच्या या संपूर्ण कार्यामध्ये तुम्हाला जी मदत लागेल ती मी करेनच. पण, आज नोंदणी झालेल्या १०० बालकांच्या पालकत्वाची जबाबदारी मी घेतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. या कामासाठी सिस्टीम तुम्ही लावायचीय, पण जे पाठबळ लागेल ते निश्चितपणे मी देईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

तसेच, कुणाला हा विचार संकुचित वाटेल. पण मी ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. मलाही मतदारसंघ आहे. त्यामुळे, दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील अशा लोकांची तुमच्याकडे नोंदणी होईल. त्या सर्वांचा खर्चही माझ्यावतीने मी तुम्हाला देईन. त्यासोबत, आपण सांगाल तिथे, सांगाल त्या व्यक्तीस भेटायला यायची माझी तयारी असेल, आपण सांगाल त्या दानशूर व्यक्तींना भेटून अनेकाचं पालकत्व स्विकारण्याचं आवाहन करण्यासाठी मी सदैव संस्थेसोबत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : ‘पुढाकार घेऊन ठाकरे, फडणवीस, राणेंना एकत्र आणा’, संभाजीराजेंची पवारांना विनंती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button