‘फडणवीस एका बॉलमध्ये चार विकेट घेणार, मिठी नदीतील घाणीचा लवकरच उलगडा होणार’

Prasad Lad - Devendra Fadnavis - Maharashtra Today

मुंबई : परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सोमवारी सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या प्राथमिक चौकशीचे सीबीआयला (CBI) आदेश दिले. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे स्वत:च्या मर्जीनुसार शिवसेनेचे प्रवक्तेपद मिरवतात. त्यांना वाटतं तेव्हाच ते प्रसारमाध्यमांना उत्तरं देतात, असे वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केले. परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi) खरा चेहरा लोकांसमोर आल्याचेही त्यांनी म्हटले.

प्रसाद लाड यांनी मंगळवारी ‘टीव्ही-9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एका बॉलमध्ये चार विकेट काढणार आहेत. लवकरच आणखी काही चेहरे समोर येतील, असा इशारादेखील प्रसाद लाड यांनी दिला आहे. सचिन वाझे याच्यावर राजकीय वरदहस्त होता. त्याचा बाप कोण होता, हे लवकरच समजेल. एनआयए (NIA) लवकरच मिठी नदीतील घाणीचा उलगडा करेल, असेही प्रसाद लाड यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button