फडणवीस यांना स्वप्नेच बघावी लागतील, शिवसेनेचे सुभाष देसाई यांचा टोमणा

Devendra Fadnavis-Subhash Desai

पुणे : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘फासा आम्हीच पलटणार, शिडीशिवाय फासा पलटणार’ असे म्हणून नुकताच महाविकास आघाडीला राजकीय भूकंपाचा इशारा दिला होता. यावर शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई  (Subhah Desai)फडणवीसांना टोमणा मारला, फडणवीसांना राजकीय स्थित्यंतराची स्वप्नेच बघावी लागतील.

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीत कुरबुर सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी महाविकास आघाडीला राजकीय स्थित्यंतराचा इशारा दिला होता.

सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमासाठी देसाई आले होते. कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलले. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात राजकीय स्थित्यंतराचा अंदाज व्यक्त केला होता. प्रश्नाच्या उत्तरात देसाई म्हणाले, की महाविकास आघाडीचे तीन पक्षांचे सरकार आता स्थिर झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेने विश्वास दाखवला आहे. सरकार पाच वर्षांची मुदत पूर्ण करणार याची खात्री आहे. फडणवीसांना राजकीय स्थित्यंतराची स्वप्नेच बघावी लागतील.

ही बातमी पण वाचा :आज अमित शाह कोकणात; महाआघाडीत ‘ऑपरेशन लोटस’ची भीती?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER