‘फडणवीस पुन्हा येतीलच, तुम्हीही या !’ भाजप नेत्याची अजितदादांना थेट ऑफर

Ajit Pawar-Devendra Fadnavis

मुंबई :- आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. जवळपास १० दिवस चाललेल्या या अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध भाजप (BJP) असा जोरदार सामना बघायला मिळाला. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला बॅकफूटवर यावे लागले. ‘महाराष्ट्र वाचवण्यासाठी जी ताकद लावायची ती लावा, पण देवेंद्रजी तुम्हाला पुन्हा यावंच लागेल, अजितदादा तुम्ही पण या हरकत नाही’ अशी ऑफरच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सभागृहात दिली. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार भाषण करत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले.

आम्ही वैधानिक मंडळांचा आग्रह करत होतो. यांनी आमची कवचकुंडलं काढली. विदर्भ आणि मराठवाड्याचा १ टक्का  निधी कमी केला. दादा तुम्ही अधिकाऱ्यांवर विसंबून राहू नका, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. नाना पटोले (Nana Patole) हे मध्येच बोलायला उभे राहिले असता आता तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका, असा सणसणीत टोलाच मुनगंटीवार यांनी लगावला. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, मला प्रश्न पडला आहे की, अजितदादा तुमच्यावर टीका करायची का नाही? कारण पुन्हा तुम्ही कधी मित्र व्हाल हे सांगता येत नाही.

महाराष्ट्र वाचवण्यासाठी जी ताकद लावायची ती लावा, देवेंद्रजी (Devendra Fadnavis) तुम्हाला पुन्हा परत यावंच लागेल. अजितदादा (Ajit Dada) तुम्ही पण या हरकत नाही. तसंच, ‘कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तीन महिने की दूरी है, फिरसे हमारा दौर आयेगा’ असं सूचक विधानही मुनगंटीवार यांनी केलं. महात्मा गांधी सेवा अनुदानासाठी २५ हजारांची तरतूद केली आहे. आज गांधीजी असते तर ते हातातली  काठी घेऊन मागे लागले असते. राज्यात पहिल्यांदाच दरडोई उत्पन्न कमी झालं आहे. अनिल देशमुख  (Anil Deshmukh) यांचं वक्तव्य दुर्दैवी होतं.

ठाकरे सरकारला ‘ठार करे’ सरकार करायचं आहे का? काही पक्षांचे चीनवर प्रेम आहे, काही जणांचे सचिनवर (वझे) प्रेम आहे. हे सरकार शरम प्रूफ आहे. आरोपींना वाचवण्यासाठी विदर्भातल्या माणसाला गृहमंत्रिपद दिले, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. त्यानंतर अनिल देशमुख बोलायला उभे राहिले. मुनगंटीवार यांनी सगळ्या मंत्र्यांची नावं घेतली. पण तुम्ही देवेंद्रजींपेक्षा सिनिअर होतात; पण मुख्यमंत्री ते झाले. तुमच्या मनातलं दुःख मला कळत होतं. तुम्ही खोटं हसून ते सांभाळत होतात. ‘तुम इतना क्यू मुस्करा रहे हो ? क्या गम हैं जिसको छुपा रहे हो’ असा मिस्कील टोला अनिल देशमुख यांनी मुनगंटीवार यांना लगावला.

ही बातमी पण वाचा : फडणवीस यांनी गृहमंत्र्यांविरोधात आणला हक्कभंग!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER