देवेंद्र फडणवीस एक दिवस ‘मातोश्री’वरही येतील : संजय राऊत

Maharashtra Today

मुंबई :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा सुरू असताना काल फडणवीस यांनी जळगावात जाऊन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची भेट घेतली. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले .फडणवीस हे काल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गेले होते. विरोधी पक्ष आता जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. लोकशाहीत कोणी कुणाचा शत्रू नसतो.

महाराष्ट्राची हीच परंपरा आहे. ते खडसेंच्या घरी गेले, त्याचं स्वागत आहे. त्याआधी ते शरद पवारांना जाऊन भेटले. त्यांचं मार्गदर्शन घेतलं असेल. मागे आम्ही भेटून लंचही घेतलं होतं. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. कशाला धुरळा उडवता? असाही टोला त्यांनी लगावला. फडणवीस यांनी केलेल्या टीकेवरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

माझ्यावरच निशाणा साधतील. त्यांची टीका मी गंभीरपणे घेत नाही. ते माझे मित्र आहेत. मित्र राहतील. त्यांचं दु:ख मी समजू शकतो. माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली. ते सत्तेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते दु:खी आहेत. पण माझ्यावर टीका करण्यात त्यांना आनंद वाटत असेल तर त्यांनी खुशाल टीका करावी. पुढील साडेतीन वर्षे टीका करून त्यांनी आनंद घ्यावा, असा टोला राऊत यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : एकनाथ खडसे आणि फडणवीसांमध्येही बोलणं झाले ; रक्षा खडसेंच्या विधानाने चर्चेला विधान 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button