‘फडणवीस योग्य मुख्यमंत्री होते, आता त्यांनी संयम न राखता चुकीची पावलं टाकली’

Devendra Fadnavis - Julio Ribeiro

मुंबई : महाराष्ट्रात उद्भवलेल्या संकटाच्या काळात विरोधी पक्षांनी घेतलेल्या सरकार विरोधी  भूमिकेवरून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो (Julio Ribeiro) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे योग्य निर्णय घेणारे मुख्यमंत्री होते.

मात्र सध्या मुख्यमंत्रिपदासाठी ते उतावीळ झाले असून, त्यांच्याकडून चुकीची पावलं टाकली जात आहेत. फडणवीस यांनी स्वतःच्या कार्यकाळात गृहमंत्री म्हणून लागू केलेल्या कायद्याचा भंग करू नये, असं ज्युलिओ रिबेरो म्हणालेत. रिबेरो यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी कायदा दाखवत कान उपटले आहेत. ज्युलिओ रिबेरो यांनी देवेंद्र फडणवीस यांना कायद्याच्या बाजू पटवून दिल्या आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन तुटवड्यावरून ब्रुक  फार्मा कंपनीच्या संचालकांना जेव्हा पोलिसांनी चौकशीसाठी आणले, त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे रात्री उशिरा पोलीस स्टेशनला दाखल झाले. खरं तर रेमडेसिवीर इंजेक्शन कोणाला वैयक्तिक किंवा संघटनांना मिळत नाही.

मी आधीच म्हटल्याप्रमाणे कोविड संकटात केवळ राज्य सरकारलाच फॅक्टरीतून इंजेक्शन वितरकांपर्यंत पोहचवण्याचा अधिकार आहे. मात्र, तरीही ब्रुक फार्माच्या पाच वेगवेगळ्या गोदामांमध्ये इंजेक्शन्सचा साठा कसा आढळून आला, हा स्वतंत्र चौकशीचा विषय आहे.  ब्रुक  फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ते गृहमंत्री असताना केलेला नियमच मोडीत काढला. राज्याच्या सुव्यवस्थेचे आणि कायद्याचे प्रतीक असलेल्या पोलीस ठाण्यात जाणे, त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालणे, अधिकाऱ्यांची चढ्या आवाजात बोलणे या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या पदाला साजेशा नव्हत्या. फडणवीस यांनी त्यांचा संयम गमावला, असे रिबेरो यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button