…माझा शब्द खरा करून दाखवणार, पण आता लढायचे आहे कोरोनाशी; फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

Devendra-Fadanvis-Uddhav-Thackeray

रायगड :- ‘मी पंढरपूरच्या जनतेला शब्द दिला होता, ‘या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करेन’ माझ्या विधानावर मी ठाम आहे; पण सध्या ही वेळ नाही. आम्हाला कोरोनाशी लढायचे आहे, या सरकारशी (Thackeray Government) नाही. ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल तेव्हा मी माझा शब्द खरा करून दाखवेन.’ असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी फडणवीस कोकणच्या दौऱ्यावर आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Govt) तीव्र टीका केली.

ते म्हणाले की, ‘रश्मी शुक्ला यांचा अहवाल बाहेर आला तर या सरकारला तोंड दाखवण्यासाठी जागा उरणार नाही. त्यामुळे हे सरकार न्यायालयात गेले आहे आणि चौकशी करू नये, अशी विनंती करत आहे. हे सरकार त्यांच्याच अंतर्विरोधामुळे पडेल हे मी आधीच सांगितले होते. आता त्याची वेळ जवळ येते आहे.’

ही बातमी पण वाचा : आत्मविश्वास नाही तर आत्मघातकी सरकार; कोकण दौऱ्यात फडणवीसांचा टीकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button