अमृता यांच्यावर टीका करणाऱ्यांचा फडणवीसांनी घेतला समाचार; सेनेलाही दिला इशारा

CM Uddhav Thackeray - Amruta Fadnavis - Devendra Fadnavis

मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर सामनाने नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. मुख्यमंत्र्यांची मुलाखत गाजत असतानाचा आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारची पोलखोल करण्यासाठी म्हणून आज विशेष पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी महाविकास आगाडीवर ताशेरे ओढले तसेच उद्धव सरकारवर सडकून टीका केली. एवढेच नाही तर, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टीका करणा-यांचाही त्यांनी समाचार घेतला.

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या ना त्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर टीका करत असतात. आता देवेंद्र फडणवीससुद्धा त्यांच्या बाजूने मैदानात उतरले असून टीका करणाऱ्या शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांना थेट इशारा दिला आहे.

‘आम्ही कधीही कुणाच्या घरच्यांवर हल्ला करत नाही. आम्ही कधीही टीका केली नाही. आम्ही संयम बाळगतो. माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे अधिकृत नेते काय बोलतात, काय टीका करतात, काय ट्विट करतात, हे सर्वांनी पाहिले आहे. पण मी कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे. मी उत्तराला उत्तर हे उत्तरानेच देईन. ’ असा इशारा फडणवीस यांनी दिला.

तसंच, ‘मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतून महाराष्ट्राला दिशा मिळेल अशी अपेक्षा होती; पण तसं काही झालं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात धमकी देणारा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. त्यांची वक्तव्ये हे शोभणीय नाही. नुसती धमकी देणारी भाषा ही नाक्यावर होत असते, वर्षपूर्तीनिमित्ताने होत नसते. विरोधकांना चिरडण्याची भाषा ज्यांनी ज्यांनी केली, ते फार काळ टिकले नाहीत, अशी टीकाही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

हे सरकार विश्वासघाताने आले आहे. जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आला आहात. कारण, एका पक्षासोबत युती करून मतं मागतात. पंतप्रधान मोदी यांचा चेहरासमोर ठेवून त्यांच्या नावाने मतं मागतात. त्यामुळे हे सरकार विश्वासघातातून आलेले सरकार आहे. आल्यानंतर एका वर्षातील उपलब्धी काय आहे, फक्त स्थगिती देण्यात आली. स्थगिती देण्यापलीकडे या सरकारने काहीही केले नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER