महाराष्ट्रात आणीबाणी लागू करून फडणवीसांना पुन्हा सत्तेत यायचेय, संजय राऊत यांचा आरोप

Sanjay Raut & Devendra Fadnavis

मुंबई :- भाजपलाच (BJP) हुकूमशाही आणि आणीबाणी हवी आहे. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात आणीबाणी लागू व्हावी, असे वाटते. तशी परिस्थिती निर्माण करून फडणवीस यांना पुन्हा सत्तेत यायचे असल्याचा आरोप शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

ठाकरे सरकारकडून (Thackeray Government) मराठा आंदोलकांची होणारी गळचेपी म्हणजे आणीबाणीच आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कले होते. यावर राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य केले. मोदी सरकार हे ‘झिरो स्टँडर्ड’ आहे. दिल्लीत आंदोलन करत असलेल्या पंजाबी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील अर्धे लोक भारतीय लष्करात आहेत. तरीही तुम्ही त्यांचा पाकिस्तानशी संबंध जोडून त्यांना देशद्रोही ठरवता. उद्या तुम्ही विरोधकांनाही देशद्रोही ठरवाल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

तसेच, शिवसेनेला इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या काळातील आणीबाणीचा विसर पडलेला नाही. मोदी सरकारकडे बहुमत असले तरी लोकशाही व्यवस्थेत त्यांना विरोधी पक्षांचा आवाज ऐकावाच लागेल. मोदी सरकार हे डबल स्टँडर्ड सोडाच पण झिरो स्टँडर्ड आहे. लोकशाहीमध्ये विरोधी आवाजाला देशद्रोही ठरवणे हीदेखील एकप्रकारची आणीबाणी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : संजय राऊतांची बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी ; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER