‘जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय’, फडणवीसांचे ट्विट

Devendra Fadnavis - Chhatrapati Shivaji Museum - Yogi Adityanath

मुंबई : आग्र्यात (Agra) बनत असलेलं मुघल म्युझियम (Mughal Museum) आता छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम (Chhatrapati Shivaji Maharaj Museum) म्हणून ओळखलं जाणार आहे. उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी सोमवारी निर्माणाधीन मुघल संग्रहालयाचे नाव बदलण्याची घोषणा केली. हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असं ते म्हणाले.

दरम्यान, योगी सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक खास ट्विट केलं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय! म्हणत योगी सरकारच्या निर्णयाची स्तुती करत जोरदार स्वागत केलं आहे. “जय जिजाऊ, जय शिवराय ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय! ” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांचा जयजयकार केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER