यशस्वी मुख्यमंत्री होण्यासाठी ठाकरेंनी फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावे : भाजपाची टीका

CM Uddhav Thackeray-kangana-ranaut

मुंबई : भाजपने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना राज्याच्या इतिहासातील सर्वात ‘अयशस्वी’ मुख्यमंत्री म्हणत हिणवले . इतकंच नाही तर ‘यशस्वी मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावी’ ,असे भाजपने (BJP) म्हटले आहे . बिहार भाजपचे प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतानाच शिवसेनेने आपलं नाव बदलून ‘बाबर सेना’ करावं, असा सल्लाही दिला.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्त्यव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतके खालच्या पातळीवर जाणारे राजकीय व्यक्ती असतील हे देशाच्या जनतेला माहीत नव्हतं’ अशी वैयक्तिक टीकाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली .

‘गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत जी वाचाळ बडबड करत आहेत आणि सोबतच मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका जी पक्षपाती कारवाई करत आहेत, ती थेट उद्धव ठाकरेंच्या निर्देशावरून आणि इशाऱ्यावरूनच होत आहे’ असा आरोपही निखिल आनंद यांनी केला.

‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबाचा वारसा आणि विचारधाराही पणाला लावली. मुख्यमंत्री पदावर आरुढ झाल्यानंतर उद्धव ठाकरे सुशांत सिंह राजपूत याला न्याय मिळवून देण्याविरुद्ध उभे राहिले. सीबीआय चौकशीचा विरोध करत राहिले, इतकंच नाही तर बॉलिवूडच्या ‘बाबा – बेबी- मुव्ही माफिया – ड्रग माफिया आणि अंडरवर्ल्ड टोळक्यातील आरोपींसोबत ते उभे राहिलेत’ असे म्हणतानाच बिहार भाजपनं थेट महाराष्ट्र सरकारला खडेबोल सुनावले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER