मुंबईत हजारो बेड्सच्या जम्बो कोविड सेंटरला केंद्राची मंजुरी, फडणवीसांनी मानले मोदींचे आभार

Devendra Fadnavis & Pm Modi

मुंबई :- देशात आलेल्या कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. अशातच कोरोना रुग्णांना लाभदायक ठरत असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी कोरोनाबाधित रूग्णांना मोठया हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. तर ऑक्सिजनअभावी काही रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील ठाकरे सरकार विविध उपाययोजना करत आहे. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रुग्णालयाबाहेरच रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, आता केंद्र सरकारने मुंबईत हजारो ऑक्सिजन बेडच्या जम्बो कोविड सेंटरला मंजुरी दिली आहे. लवकरच मुंबईत हे सेंटर उभारण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारची (Maharashtra Govt.) विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अतिशय आभारी आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बीपीसीएलने होकार दिला आहे. त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेडस येथे उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील, असे म्हणत फडणवीस यांनी मोदींचे आभार मानले आहेत.

बीपीसीएलचे संचालक अरुणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी राज्य सरकारने कम्प्रेसरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजन सिलेंडर्स भरून देण्याची सुद्धा तयारी दर्शविली आहे. त्यामुळे सुद्धा मोठा दिलासा महाराष्ट्राला मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button