फडणवीसांनी शब्द पाळला, सरकारी रुग्णालयात घेत आहेत कोरोनावर उपचार!

Devendra Fadnavis

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कोरोना पॉझेटिव्ह आदळल्यानंतर कोरोनाच्या सरकारी उपचार केंद्रात, मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत. कारण, त्यांनी तसे म्हटले होते. शब्द पाळला. फडणवीस यांनी स्वत: ट्विट करून कोरोना पॉझेटिव्ह झाल्याची माहिती दिली होती.

उल्लेखनीय आहे की काही दिवसांपूर्वी फडणवीस कोरोनाच्या पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी, कोरोनाच्या उपचारांबाबत जनतेचा सरकारी यंत्रणेवर विश्वास बसावा म्हणून फडणवीस यांनी महाजन याना फोन करून सांगितले होते की, मला कोरोनाची लागण झाल्यास उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करा.

माझी कोरोना चाचणी पॉझेटिव्ह आली आहे, असे ट्विट फडणवीस यांनी केल्यानंतर काही नेटीझन्सने फडणवीसांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन देत ते सरकारी रुग्णालयात उपचार घेणार का, असा प्रश्न विचारला होता. फडणवीसांनी त्यांना कृतीने उत्तर दिले.

फडणवीस यांच्यासाठी प्रार्थना

देवेंद्र फडणवीस कोरोनाच्या आजारातून लवकर बरे व्हावेत यासाठी भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांकडून फडणवीस यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. Get Well Soon मॅसेज पाठवत ट्विटर आणि फेसबुकवरुन भावना व्यक्त करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER