निषेधाच्या ‘या’ घोषणेमुळे फडणवीसांना हसू अनावर

Ajit Pawar - Devendra Fadnavis

मुंबई : अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) सादर केलेल्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पाचा निषेध करताना भाजपाच्या आमदारांनी दिलेल्या घोषणांमधील ‘पुणे-बारामतीसाठी अर्थसंकल्प मांडणाऱ्यांचा धिक्कार असो’ या घोषणेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हसू आवरू शकले नाहीत.

प्रश्नोत्तर सुरू होण्याच्या आधी भाजपाच्या आमदारांनी अंदाजपत्रकातील शेतकऱ्यांसाठीच्या अपुऱ्या तरतुदीचा निषेध करताना घोषणा दिल्या – ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ आणि नंतरची घोषणा होती ‘ पुणे-बारामतीसाठी अर्थसंकल्प मांडणाऱ्यांचा धिक्कार असो’ ही घोषणा ऐकल्यानंतर फडणवीस हसू आवरू शकले नाहीत. या घोषणेत भाजपाच्या आमदारांनी थेटपणे बारामतीचा आणि अप्रत्यक्षपणे अजित पवारांचा उल्लेख केला. अर्थसंकल्पावर टीका करताना फडणवीस म्हणालेत, केंद्राकडून आलेला निधी सांगायचा नाही.

केवळ थकबाकी सांगायची. केंद्राच्या मदतीने सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख अर्थसंकल्पात करायचा; मात्र इतर वेळी केंद्रावर टीका करायची, महाविकास आघाडी सरकारचे असेच सुरू आहे. अर्थसंकल्पात याचाच प्रत्यय आला. महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे रडगाणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER