मोठ्या अभिनेत्यांबद्दल विधान केले की दिवसभर प्रसिद्धी मिळते; फडणवीसांचा पटोलेंना टोला

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आझाद मैदानातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीकेचे बाण सोडले. विनाअनुदानित शिक्षकांसंदर्भातील आमच्या सरकारचा निर्णय ठाकरे सरकारनं थांबवल्यानं शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ आली. तसेच मोठ्या अभिनेत्यांबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते, असा टोलाही फडणवीसांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना (Nana Patole) लगावला.

नाना पटोलेंचं अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांच्या संदर्भातली विधानं म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी आहे. एखाद्या मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते. म्हणजे बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंना लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यामध्ये वाढ करून पुढे तो ४० टक्के करणार होतो. हा निर्णय जवळपास ६० टक्के झाला होता. पुढे काय झालं हे वेगळं सांगायची गरज नाही.

सत्ता बदलली तशा गोष्टी बदलल्या गेल्या. आम्ही घेतलेला निर्णय सत्ता असती तर पुढे राबवला असता. इथे हजारो आंदोलने पाहिली आहेत; पण आजवर इथे असं होत नव्हतं. आम्ही आंदोलनाची दखल घेत होतो. आंदोलनाकडे सरकारचं अजिबात लक्ष नाही. भाजपचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न आम्ही आजच्या बैठकीत मांडणार आहोत. जर असं झालं नाही तर अधिवेशन चालू देणार नाही. एकीकडे मुंबईच्या बिल्डरांना पाच हजार कोटींची सूट तर दुसरीकडे ३०० ते ४०० कोटी रुपये नाहीत. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू. आता शिक्षकांचा अंत बघू नका, असं फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER