महाराष्ट्र कोसळला तर देश कोसळेल हे फडणवीसांनी समजून घ्यावं’ – संजय राऊत

sanjay-raut--devendra-fadnavis

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) किंवा केंद्र सरकारशी आमचं कुठलंही वैयक्तिक वैर अथवा भांडण नाही. केवळ महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडायचं, हे योग्य ठरणार नाही. हे राष्ट्रीय एकात्मता आणि संसदीय लोकशाहीच्या हितासाठी चांगलं नाही. कोरोनामुळे महाराष्ट्र कोसळला तर देशही कोसळेल, ही गोष्ट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) याना माहिती असायला हवी, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केले.

ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्रात लागणाऱ्या संभाव्य लॉकडाऊनच्या निर्णयाचे समर्थन केले. मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय हा काही आनंदाने घेत नाहीत. आपातकालीन परिस्थितीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना असे निर्णय घेणे बंधनकारक असते. अशावेळी आपला वैयक्तिक दृष्टीकोन वेगळा असला तरी एक राज्य म्हणून महाविकासआघाडीतील घटकपक्ष आणि विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी खंभीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे, असे संजय राऊत म्हणाले.

राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत राजकीय पक्षांची वेगवेगळी मतं असू शकतात. महाविकासआघाडीतील घटकपक्ष आणि विरोधी पक्षांचे मत याबाबत वेगळे असू शकते. मात्र, लॉकडाऊन करायचा की नाही, याचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार केवळ आणि केवळ मुख्यमंत्र्यांनाच आहे. आपातकालीन परिस्थितीत राज्याच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांना असा निर्णय घ्यावा लागू शकतो, असे राऊत यांनी म्हटले.

यावेळी संजय राऊत यांनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या काँग्रेसला हळुवार चिमटाही काढला. आता लॉकडाऊन हादेखील इतर विषयांप्रमाणे काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे किंवा नाही, हे मला माहिती नाही. पण माझ्या मते हा राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. कोरोना परिस्थितीतील महाराष्ट्राच्या कामगिरीचे कौतुक झाले पाहिजे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत, ही बाब मान्य आहे. मात्र, महाराष्ट्राचा कोरोना चाचण्याच जास्त होत असल्यामुळे रुग्णही जास्त सापडत आहेत. त्यासाठी महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतूक केलंच पाहिजे. दुसऱ्या राज्यांमध्ये इतक्या मोठ्याप्रमाणावर कोरोना टेस्ट होत नाहीत. कोण कुठे जातंय, कशाने मृत्यू झाला, का आजारी आहे, याची कसलीच माहिती इतर राज्यांकडून ठेवली जात नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button