फडणवीस संभाजीराजेंना म्हणाले, मराठा आरक्षणासाठी कोणासोबतही बसायला तयार, पण…

Maharashtra Today

मुंबई : मराठा आरक्षणाच्या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी कोणासोबतही चर्चा करण्यासाठी तयार आहे. पण समोरच्यांनी राजकारण करू नये, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.

संभाजीराजे छत्रपती सध्या आरक्षणासाठी राज्यभरातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यामध्ये काहीही गैर नाही. ते मलादेखील भेटले होते. त्यावेळी मी संभाजीराजेंना इतकंच सांगितलं की, आम्ही मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) तिढा सोडवण्यासाठी कोणासोबतही चर्चेला बसायला तयार आहोत. केवळ समोरच्यांनी राजकारण करू  नये, एवढीच आमची अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवारी) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजेंच्या भूमिकेचे स्वागत केले. संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी राज्यातील सर्व नेत्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी भाजपचा पाठिंबा आहे, असे फडणवीस म्हणालेत.

खोटे बोलण्याच्या स्पर्धेत पहिले १० असतील राज्यातील मंत्री!

काही मंत्री केवळ खोटे  बोलत आहेत. जगात खोटे बोलण्याची स्पर्धा झाली तर पहिल्या १० मध्ये राज्यातील मंत्रीच येतील. मराठा आरक्षणावर मंत्री खोटे बोलत होते. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही खोटे बोलत आहेत. या सरकारने ओबीसी आरक्षणाबाबतचा ऑर्डिनन्स ‘लॅप्स’ होऊ दिला. मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग गठित करावा लागेल, असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सांगत आहेत. मी पाच पत्रे  देऊन तेच तर सांगत होतो. मी १५ महिन्यांपासून हेच करतो आहे. आता तरी जागे व्हा, आता तरी डाटा जमवा. पण सरकारने अजून काहीच केले नाही, असा आरोप त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button