फडणवीस म्हणाले, अजित पवारांचे आभार मानतो

Ajit Pawar-CM Fadnavis

मुंबई : राज्यामध्ये स्थिर सरकार देण्यासाठी पुढाकार घेत अजित पवार यांनी भाजपबरोबर येण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीचे इतरही काही नेते आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे आम्ही सत्तास्थापनेचा दावा केला.

‘अजित पवारांच्या निर्णयाला माझा पाठिंबा नाही’ : शरद पवार

शुक्रवारी संध्याकाळपर्यंत राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत येईल अशी चर्चा असतानाच अचानक आज राज्याच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, शेतकऱ्यांचे आणि राज्यासमोरील इतर प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एकत्र आलो.

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार येत असेल तर रस्ता काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही सरकार स्थापन केलं. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या सत्तास्थापनेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, हे सरकार स्थापन होणं कठीण वाटत होतं.