उद्धव ठाकरेंच्या ‘वैफल्यग्रस्त’च्या टीकेला फडणवीसांचे उत्तर; म्हणाले…

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या नुकसान पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ‘विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही’ असा टोमणा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मारला होता. याला उत्तर देताना फडणवीस म्हणालेत की – मला काही राजकीय बोलायचे नाही, अन्यथा मीदेखील बोलू शकतो. पण मुख्यमंत्री आले त्याचे समाधान आहे. फडणवीस देखील सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत.

ही बातमी पण वाचा : मी विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे वैफल्यग्रस्त नाही’; उद्धव ठाकरेंचा टोला

उद्धव ठाकरे

मोदींकडून गुजरातच्या नुकसानाची पाहणी करुन जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ठाकरे म्हणानालेत की, मला त्यात राजकारण आणायचे नाही. पंतप्रधान संवेदनशील असून गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मागेही उभे राहतील असा विश्वास आहे. मी विरोधी पक्षनेता नाही, त्यामुळे वैफल्यग्रस्त नाही.

फडणवीसांचे उत्तर

याबाबत फडणवीस म्हणालेत, त्याच्यावर मला काही राजकीय बोलायचे नाही, अन्यथा मीदेखील बोलू शकतो. पण मुख्यमंत्री आले त्याचे समाधान आहे. आम्ही त्याचे राजकारण करत नाही. पण, जे लोक प्रश्न विचारतात की पंतप्रधान गुजरातला का गेले आणि महाराष्ट्रात का आले नाहीत? त्यांनी, मुख्यमंत्रीदेखील दोनच जिल्ह्यात का आले? रायगड, कोल्हापूर, साताऱ्याला का गेले नाहीत? याचे उत्तर द्यावे.

मदतीवरून टोमणा, नुसत्या बाता मारता

मागच्या वर्षी कोकणात (konkan) आलेल्या ‘निसर्ग’ वादळासाठी उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेली मदत अजून मिळाली नाही अशा तक्रारी आहेत. यावर फडणवीस यांनी ठाकरेंना टोमणा मारला – “तुम्ही येता आणि जाता….मागच्या वेळीदेखील येऊन गेलात. नुसत्या बाता मारत असून कोकणाला काही दिले नाही. गेल्यावेळचे ‘निसर्ग’ वादळाचे पैसेही यांनी दिलेले नाहीत आणि येथे येऊन राजकीय वक्तव्य करतात याचं आश्चर्य वाटते”.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button