आमचे नेते कुठूनही निवडून येऊ शकतात ; शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रतिउत्तर

मुंबई :- ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना टोला लगावला. त्यानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चंद्रकांतदादांची बाजू घेत पवारांना प्रतिउत्तर दिले आहे . आमचे नेते कुठूनही निवडून येऊ शकतात, हे महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांच्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता, महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं” असं म्हणत शरद पवार मिश्किल हसले. “ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू? अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. यावर पवार साहेब काय म्हणाले माहिती नाही. सगळ्यांनाच गाव सोडून इकडे तिकडे कधी ना कधी जावं लागतं. पण चंद्रकांत पाटील आपल्या गावातून दुसऱ्या गावात गेले, तरी निवडून आले ना. ते राज्याचे नेते आहेत. आमचे राज्याचे नेते कुठूनही निवडून येऊ शकतात, हे महत्त्वाचं आहे” असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले.

ही बातमी पण वाचा : आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात जाण्याऱ्या महत्वाच्या नेत्याबद्दल काय बोलणार – शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER