अशा कांगावाखोरांना मी उत्तरे देत नाही; नाना पटोलेंच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर

Devendra Fadnavis - Nana Patole - Maharashtra Today

अकोला :- देशाला स्मशानभूमी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) करावे, असे आव्हान काँग्रसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले होते. त्यांच्या या आव्हानाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिले. मी मोदींना नेहमीच पत्रं लिहीत असतो; पण कांगावाखोरांना उत्तर देत नाही, असं म्हणत फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाना पटोलेंच्या आव्हानाची हवा काढली.

देवेंद्र फडणवीस आज अकोल्यात होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांच्यावर टीका केली. मी मोदींना सतत पत्रं लिहीत असतो. महाराष्ट्राला लागणारी आवश्यक ती सर्व मदत मोदींकडून मागत असतो आणि मोदींकडून ती मदत मिळतही असते. महाराष्ट्राला सर्वाधिक व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर (Remdesivir) मोदींनी दिले. पण काहींना कांगावा करण्याची सवय झाली आहे. अशा कांगावाखोरांना मी उत्तरे देत नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

अमरावतीत तिसरी लाट येणार की नाही, असं काही अधिकृत सांगण्यात आलेलं नाही. राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी राज्याला आतापासूनच तयारी करावी लागेल. ही तिसरी लाट लहान मुलांना मोठ्या प्रमाणात धोकादायक ठरू शकते असे सांगितले जात आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधा तयार ठेवाव्या लागतील. यावेळी त्यांना अकोल्यातील व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर अनेक नेते काहीच करत नाहीत. ते फक्त कांगावा करत आहेत. केवळ निकृष्ट, निकृष्ट असल्याचं सांगत आहेत. मोदींनी राज्याला व्हेंटिलेटर दिले नसते तर काय झाले असते? अकोल्यात टेक्निशियन दिला आणि लगेच व्हेंटिलेटर सुरू झाले. टेक्निकल गोष्टी कशाही डम्प केल्या की त्या सुरू होणार नाहीत, असंही ते म्हणाले.

ग्रामीण भागात कोरोनाचा (Corona) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आमदारांच्या निधीतून आरोग्य सुविधांसाठी एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण हा पैसा देण्याबाबत प्रशासकीय यंत्रणा अजून गतिमान झालेली नाही. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्या वाढली आहे. त्याहीपेक्षा मृत्युसंख्या वाढत असल्याने ही चिंताजनक बाब आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंगप्रकरणाची चौकशी करून कारवाई करा : नाना पटोले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button