“देशाचे पंतप्रधानदेखील स्वत: ओबीसी आहेत”, भुजबळांच्या मागणीवर फडणवीसांचे उत्तर

Chhagan Bhujbal-Devendra Fadnavis

मुंबई :- राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सभागृहात ओबीसींची स्वतंत्र जगगणना करण्यात यावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झालेले पाहायला मिळाले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केल्यानंतर त्यांच्या या मागणीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिलं आहे. समर्थन देताना देवेंद्र फडणवीस यांनी योगायोगाने देशाचे पंतप्रधानदेखील ओबीसी असल्याचं सांगितलं.

छगन भुजबळ म्हणाले –

बीहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातदेखील ओबीसींची वेगळी जनगणना करण्यात यावी. जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसीचा एक वेगळा पर्याय दिला तर जनगणना होऊ शकते असंही यावेळी त्यांनी सांगितलं. यासाठी “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी आग्रह धरला पाहिजे. फक्त ठराव मांडून विषय सोडून चालणार नाही. दिल्ली दरबारी आपण हा प्रश्न मांडला पाहिजे असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासाठी समर्थन दिले. तसेच ते म्हणाले, “आम्हाला या विषयाबद्दल आधी कळवलं असतं तर आम्ही अधिक माहिती घेतली असती.

आम्हाला विश्वासात घेतलं असतं बरं झालं असतं. भुजबळ यांनी मांडलेला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आमचं त्यांना समर्थनच आहे. ओबीसींसाठी योजना, कार्यक्रम राबवताना जनगणना माहिती असेल तर धोरण आखण्यास मदत होते.

सातत्याने ही मागणी होत आहे. सर्व पक्षांचं त्याला समर्थन आहे. ठराव केल्यानंतर आपण रजिस्ट्रार जनरलकडे पाठवला. शेवटी तेदेखील अधिकारी आहेत. जे काही नियम आहे त्यानुसार त्यांनी संविधानात तरतूद नाही वैगेरे उत्तरं दिली आहेत. पण हा धोरणात्मक निर्णय आहे. खरं तर देशाच्या पंतप्रधानांना काही जात नसते. पण योगायोगाने देशाचे पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत. धोरणात्मक निर्णय असल्याने आपण पंतप्रधानांकडे जाऊन विनंती करणं गरजेचं आहे.

त्यासाठी अध्यक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसींची वेगळी जनगणना करण्यात यावी भुजबळांच्या मागणीला फडणवीसांचेही समर्थन


Web Title : Fadnavis responds to bhujbal remark on obc separate census

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)