फडणवीसांचे प्रकल्प उद्धव यांच्या रडारवर

badgeसरकार बदलले तर राजकारण बदलले हे समजू शकते. पण एक सरकार म्हणून सुरू झालेले विकासाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प नव्या सरकारने थंड्या बस्त्यात टाकणे योग्य आहे का? हा प्रश्न सामान्य माणसाला पडला असेल. पण राजकारणी जुने हिशेब चुकता करायला निघाले आहेत. उद्धव ठाकरे यांचे नवे सरकार आधीच्या सरकारचे ड्रीम प्रोजेक्ट थंड्या बस्त्यात टाकायला निघाले आहे. भविष्यातले राजकारण शेतकरी केंद्रस्थानी ठेवून होणार आहे. देवेंद्र सरकारने सशर्त कर्जमाफी केली होती. तरीही ते सर्व शेतकऱ्यांना समाधानी करू शकले नाहीत.

ही बातमी पण वाचा : शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर खळबळ

आता संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांची व्होट बँक खिशात टाकायचा शिवसेनेचा छुपा डाव आहे. त्या हाणामारीत अनेक विकास प्रकल्पांची हत्या होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची झाली तर ३५ हजार ८०० कोटी रुपये हवेत. त्याशिवाय अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या एक कोटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायची आहे. एवढे पैसे आणणार कुठून? देवेंद्र सरकारने ३० हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली होती. पण ते फक्त १८ हजार कोटी रुपयेच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकले.

तरीही उद्धव यांचा कर्जमाफीसाठी आटापिटा सुरू आहे. सत्तेत आलो तर सातबारा कोरा करू, असे ते वारंवार बोलले आहेत. ‘करून दाखवलं’ हे त्यांना दाखवायचे आहे. पण जमेल? राज्य सरकारवर सध्याच पावणेसात लाख कोटी रुपयांचे कर्ज असताना आणखी बोजा वाढवणे शहाणपणाचे होईल का? अधिकारी नको म्हणत आहेत. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचे मसीहा बनू पाहात आहेत. त्यामुळे आल्या आल्या त्यांनी सरकारी बैठकांचा सपाटा लावला आहे. प्राधान्य नसलेले प्रकल्प बाजूला ठेवले जातील असे त्यांनी म्हटले आहे.

पण सरकार बदलताच प्राधान्य का बदलावे? बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग ह्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांना ब्रेक मारण्याचे उद्धव यांनी योजिलेले दिसते. ह्या योजनांचे पैसे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी वापरायचे असा त्यांचा बेत दिसतो. ह्या आडून मोदी आणि भाजपशी संघर्ष छेडण्याचा प्रयत्न उद्धव यांचा दिसतो आहे. ह्या संघर्षातून ते स्वतःची प्रतिमा देशव्यापी करू पाहात आहेत. तसे असेल तर मोदींना त्यांनी अजून ओळखलेच नाही असे म्हणावे लागेल.

देवेंद्र यांच्या बाउंसर्सनी फोडला घाम