‘तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला’, फडणवीसांनी सातव यांना वाहिली श्रद्धांजली

Maharashtra Today

मुंबई : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव(Rajiv Satav) यांचे कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस आढळला होता. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनीही ट्विट करत सातव यांना श्रद्धांजली वाहिली. ‘तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला, अश्या शब्दात फडणवीस यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो! ॐ शान्ति, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button