शिवसेनेने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्याऐवजी राज्य सरकारने कर कमी करावेत : फडणवीस

मुंबई : शिवसेनेने (Shivsena) इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्याऐवजी आंदोलन करण्याऐवजी सरकारने स्टेट टॅक्स कमी करावेत. ते सोडून आंदोलनाची नौटंकी करू नये, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

राज्य सरकारने कर कमी करावेत, अशी मागणी शिवसेनेकडून इंधन दरवाढीविरोधात उद्या शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे, त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी टिका केली आहे.

फडणवीस म्हणाले, हिंदुत्व फक्त भाषणातून नसतं.तुम्ही हिंदूत्व का सोडलं ? एल्गार परिषदेत समाजात तेढ निर्माण करण्याचं काम झालं. एल्गार प्रकरणी सरकारची बोटचेपी भूमिका घेत असल्याच टीका फडणवीस यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER