‘2019 च्या सत्तास्थापनेची चर्चा शरद पवारांसोबत….’; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

नागपूर :- 2019 च्या वेळी सत्तानाट्य संपुर्ण महाराष्ट्राने पाहिलं. भाजप आणि राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केल्याने सर्वजण चक्रावले होते. त्यावेळी नेमकं काय झालेलं हे प्रत्येकाला जाणून घ्यायची इच्छा आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) एका कार्यक्रमात गौप्यस्फोट केला आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये राज्यात सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच (NCP) भाजपाकडे प्रस्ताव पाठविला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सरकार स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडूनच आला होता. आमची बोलणीदेखील अंतिम झाली होती. सरकार बनवण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली त्यानंतर खातेवाटप, जिल्ह्यांचे पालकमंत्रीदेखील निश्चित केलं होतं. याबाबत सर्व चर्चा शरद पवारांसोबत झाल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आमची शिवसेनेशी बोलणी सुरू होती. मात्र त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याचे ठरविले असल्याचे आम्हाला कळाले. त्यानंतर १० ते १२ दिवस आम्ही विविध पर्यायांवर विचार केला व राष्ट्रवादीशी बोलणी केली असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी फेसबुकद्वारे सत्तास्थापनेबाबत बोलताना त्यांच्या या कार्यक्रमाचे ‘फेसबुक’वर ‘लाईव्ह’ सुरू होते. या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांचे कॅमेरे नाहीत, म्हणून मी दिलखुलासपणे बोलू शकतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र शरद पवारांबाबत त्यांनी वक्तव्य केल्यानंतर काही वेळातच ‘फेसबुक लाईव्ह’च बंद झाले. याशिवाय ‘फेसबुक लाईव्ह’ची ‘लिंक’देखील हटविण्यात आली. त्यामुळे अशाप्रकारे ‘लिंक’ हटविण्याचे गुपित काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत लोकमतने वृत्त दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER