पुण्यात कोरोना चाचणीची क्षमता वाढवण्यासाठी नव्या लॅबला परवानगी द्यावी ; फडणवीस यांची मागणी

Devendra Fadnavis & CM Uddhav Thackeray

पुणे : पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून दिवसेंदिवस नवे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्शवभूमीवर कोरोना चाचण्यांची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारने नवीन प्रयोगशाळांना मान्यता द्यावी, अशी विनंती विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

देशभरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी संपूर्ण राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पुणे शहरात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. पुणे महापालिकेकडून सध्या स्वॅब कलेक्शन मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं आहे. त्यावर पुढील प्रक्रिया होण्यास बराच कालावधी लागत असल्याने संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.

कोरोना विषाणूसंबंधी स्वॅब टेस्टिंगची क्षमता वाढवण्याबाबत पुणे महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी विनंती केली आहे. तरीही याबाबत लवकर निर्देश द्यावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

letter

देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीदेखील याबाबत उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला