फडणवीसच जनतेचे खरे प्रतिनिधी, त्यांच्यामुळे नागपुरातील कोरोना आटोक्यात – प्रवीण दरेकर

Devendra Fadnavis & Pravin Darekar - Maharastra Today
Devendra Fadnavis & Pravin Darekar - Maharastra Today

मुंबई :- महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणाविरोधात आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरावे लागत आहे. ठाकरे सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात कमी पडत आहे. रुग्णांना बेडस् उपलब्ध होत नसल्यामुळे कुठे खुर्चीवर तर कुठे गाडीमध्ये, जमिनीवर रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात येत आहे. म्हणूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व आम्ही सर्व जण रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करत असल्याचे दरेकर यांनी म्हटले.

आज मुंबईत दोन कोविड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. कांदीवली येथील भुराभाई आरोग्य भवन कोविड सेंटर व नित्यानंद मनपा शाळा अंधेरी येथे रवींद्र जोशी फाउंडेशन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या कोविड केअर सेंटरचा लोकार्पण कार्यक्रम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आज पार पडला. या निमित्ताने दरेकर बोलत होते. दरेकर यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच लोकांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरबद्दल आमदार योगेश सागर यांचे व सेंटरच्या उभारणीत योगदान असलेल्या सर्वांना धन्यवाद दिले. यावेळी दरेकर म्हणाले की, नागपूर येथे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात येताच, देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ नागपूर (Nagpur) गाठून मुक्काम ठोकला.

रुग्णसंख्या नियंत्रणात आणली. नागपुरात अशी परिस्थिती असताना नागपूरबरोबरच देवेंद्रजी मुंबईतही वेळ देतात. यावेळी त्यांनी दोन दिवसांपूर्वी घाटकोपर येथे झालेल्या कोविड सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमाचीही आठवण करून देत देवेंद्रजींचे आभार मानले. महाराष्ट्रात व मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्य सरकार मात्र फक्त केंद्रावर टीका करण्यात धन्यता मानत आहे. एकीकडे सरकार केवळ आरोप करण्यात व्यस्त असताना फडणवीस यांच्यासारखे जनतेचे खरे प्रतिनिधी अहोरात्र मेहनत करून वेगवेगळ्या सुविधा जनतेला उपलब्ध करून देत आहेत, अशीच मेहनत करून लवकरात लवकर राज्याला व पर्यायाने देशाला आपण कोरोनामुक्त करूयात, असे प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button