ओबीसी आरक्षणावरून फडणवीस भुलभुलैया करतात; छगन भुजबळांची टीका

Maharashtra Today

मुंबई :- ओबीसी आरक्षणाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करत असलेल्या दाव्यात काही तथ्य नाही. आरक्षणावरून फडणवीस हे भुलभुलैया करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते. यानंतर भुजबळांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले की, “कोर्टाकडून ओबीसींच्या लोकसंख्येची विचारणा केली जात होती. जनगणनेचे आकडे केंद्राकडे आहेत. आमच्याकडे नाहीत. तुम्ही केंद्राला आदेश दिल्यास तुम्हाला आकडेवारी देऊ शकतो, असे कोर्टाला सांगितले आहे. ओबीसी आरक्षणावरून फडणवीस भुलभुलैया करत आहेत. आम्हाला यावर राजकारण करायचे नाही.”

मुख्यमंत्र्यांची महाधिवक्त्यांशी चर्चा
पदोन्नतीतील आरक्षणाबाबतची चर्चा अद्यापही संपलेली नाही. ही चर्चा सकारात्मक झाली. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. तसेच आज ओबीसींच्या आरक्षणावरही चर्चा झाली. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाधिवक्ता आज रात्री या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत होता तेव्हा मंत्री मोर्चे काढण्यात मग्न होते, फडणवीसांचा घणाघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button