‘योग्यवेळी ठाकरे सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार’, फडणवीस आपल्या शब्दावर ठाम

Devendra Fadnavis - Mahavikas Aghadi

मुंबई : देशभरातील पाच राज्यांसह, पंढरपूर-मंदळवेढा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘करेक्ट कार्यक्रमा’ची भाषा केली होती. पंढरपुरात भाजपचे (BJP) उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Autade) विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार भगीरथी भालके (Bhagirath Bhalke) यांचा ३७०० मतांनी पराभव केला. या विजयानंतर या ‘करेक्ट कार्यक्रमा’ची देखील चांगलीच चर्चा सुरु आहे. कारण “मी करेक्ट कार्यक्रम करतो, असं बोललो होतो. आजही मी त्या वक्तव्यावर ठाम आहे. योग्य वेळी ठाकरे सरकारचा (Thackeray Government) करेक्ट कार्यक्रम करणार आहे. पण आता कोरोनाशी लढायचं आहे. ही वेळ नाही. आता आम्ही आमचे श्रम कोरोनासाठी खर्च करणार आहे”, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

पंढरपूर-मंदळवेढा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांवर सडकून टीका केली. यावेळी फडणवीस म्हणाले की, भाजपवर जनतेनं विश्वास दाखवला हे या पोटनिवडणुकीतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे मी पंढरपूरच्या जनतेचं मनापासून आभार मानतो. गेल्या दीड वर्षातील महाविकास आघाडीच्या गैरप्रकाराला, भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला एकप्रकारे आरसा दाखवण्याचं काम पंढरपुरच्या जनतेने केले. हे सरकार आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीच्या मैदानात राज्य सरकारचे तीन पक्ष एकत्रित उतरले. साम-दाम-दंड-भेदचा वापर केला गेला. त्यांनी प्रशासनाचा गैरवापर केला. मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करण्यात आला. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आमचे उमेदवार समाधान आवताडे यांचं अभिनंदन करतो. जमिनीशी जुळलेले व्यक्तीमहत्व म्हणून ते गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत प्रशांत पारिचारक आणि उमेश पारिचारक हे देखील राम-लक्ष्मणाप्रमाणे त्यांच्यासोबत उभे राहिलेत. रणनिती आखून ही निवडणूक लढवली गेली. आम्हाला पंढरपुरात पांडुरंगाचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे. आमच्या टीमने खूप मेहनत घेत चांगलं काम केलं. भाजप एकत्रित काम करत होती. जनतेपर्यंत पोहोचून आम्ही जनतेची मत मिळवू शकलो. या सरकारने कोरोना (Corona) काळात कोणाला मदत केली नाही. बारा बलुतेदारात नाराजी होती, वीज तोडली गेली त्यावरुन जनता नाराज होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला निवडलं”, असं मत त्यांनी मांडलं.

आम्हाला इतर राज्यांतही अपेक्षेप्रमाणे यश मिळालं आहे. बंगालमध्ये आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या तरी चांगल्या जागा मिळाल्या. बंगालमधून कम्युनिस्ट आणि काँग्रेस पक्षाचा सफाया झाला आहे. तिथे उजव्या विचारांना भक्कम पाया लाभला आहे. आता भगाव्याचं राज्य त्या ठिकाणी होत आहे. महाविकास आघाडीचे नेते दुसऱ्याच्या घरी मूल झालं म्हणून ढोल बडवत आहेत, मिठाई वाटत आहेत. बेगानी शादीमे अब्दुल्ला दीवाना म्हणजे काय हे आज पाहिलं असा टोला यावेळी त्यांनी लगावला. मोदी आणि अमित शाह (Amit Shah) यांची लोकप्रियता कमी झालं असं नाही. या संदर्भातील उचित विश्लेषण केंद्रीय मंत्री करतील असंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेचा संबंध नाही, राष्ट्रवादी आज हरले, काँग्रेसला (Congress) फटका पण ममता दीदी यशामुळे यांना इतका आनंद झालाय? या निवडणुकीत ममता यांना निवडून यायला दमछाक झाली हेही दिसलं, असा टोला फडणवीसांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button