फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकून सरकारी कामात हस्तक्षेप केला; दिलीप वळसे-पाटलांनी दिले कारवाईचे संकेत

Devendra Fadnavis - Dilip Walse Patil

मुंबई : ब्रुक फार्माच्या मालकाची चौकशी करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलिसांवर दबाव आणला. हा सरकारी कामातील हस्तक्षेप आहे. यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी सांगितले. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधला. राज्यात ५० हजार रेमडेसिवीरचा (Remdesivir) साठा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुरवठादाराकडे लसीचा पुरवठा करण्याचे पत्र असल्याचे पोलिसांना माहीत नव्हते. पुरवठादाराने ते पत्र दाखवले नव्हते. यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले. मात्र, ही चौकशी सुरू असताना देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात पोहचले. फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला. शासकीय कामात हस्तक्षेप केला. त्यामुळे चौकशीत बाधा आली आहे. या गोष्टी योग्य नाहीत आणि पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही, असा इशारा वळसे-पाटील यांनी दिला आहे.

ब्रुक फार्माच्या मालकाला का बोलावले? कशासाठी बोलावले? असा सवाल करण्यात आला. पोलिसांना कोणालाही बोलावण्याचा अधिकार आहे. ते कोणाचीही चौकशी करू शकतात. फडणवीस यांनी दबाव टाकूनही ब्रुकच्या मालकाला सोडले नाही. परवानगीचे पत्र दाखवल्यानंतर त्याला सोडण्यात आले. त्याला चौकशीसाठी पुन्हा बोलावू असे पोलिसांनी सांगितले, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button