फडणवीस यांनी उद्धव सरकारच्या षड्यंत्राची लावली वाट

Cm Uddhav Thackeray & Devendra Fadnavis

मुंबई : विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकींना अधिकाऱ्यांनी हजर राहू नये, या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारच्या आदेशाची देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वाट लावली. कोरोनाच्या संदर्भात फडणवीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहे पण याचे स्वरूप बैठक नसून माहिती घेणे असे असते !

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीस यांनी जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे सुरू केले. फडणवीस यांच्या बैठकांमध्ये वरिष्ठ अधिकारी हजर राहत असल्यामुळे चिडलेल्या ठाकरे सरकारने, विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी हजर राहू नये असा आदेश काढला.

फडणवीस सरकार सत्तेत असताना त्यांनी असाच आदेश काढला होता. त्याचाच आधार घेऊन ठाकरे सरकारने फडणवीस यांची जिरविण्याचे ठरवले. पण राजकारणात मुरलेल्या देवेंद्र फडवीस यांनी ठाकर सरकारचा हा डाव उधळून लावला.
अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी नवा मार्ग निवडला. कोरोनाच्यासाथीची माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक न घेता, याबाबतची माहिती घेण्यासाठी फडणवीस स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात जात आहेत. फडणवीस यांच्या या भेटीच्या वेळी सर्व माहिती घेऊन वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहत आहेत.

अशा प्रकारे फडणवीस यांनी आतापर्यंत किमान ६ जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी (बैठका) घेतल्या आहेत. सर्व ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांसोबत वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात असे लक्षात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER